या शहरात आहे 32 मजल्यांची दफनभूमी जागेच्या कमतरतेवर काढला पर्याय | Lokmat Marathi News

2021-09-13 0

प्रत्येक धर्मात मृतांच्या अंत्यसंस्कारांची वेगवेगळी पद्धत आहे. पण सध्या हिंदू धर्माव्यतिरिक्त बहुतांश धर्मांमध्ये मृतदेहांना विधीवत जमिनीत पुरले जाते. त्यानंतर अनेक वर्षं लोटूनही या मृतदेहांचे पूर्णत: विघटन होत नाही. त्यामुळे त्या जागेचा पुन्हा वापर करता येत नाही. वाढत्या लोकसंख्ये मुळे आता अनेक देशांमध्ये दफनभूमी अपूऱ्या पडत चालल्या आहेत. त्यामुळे काही पाश्चिमात्य देशांनी शक्कल लढवत बहुमजली दफनभूमी बांधल्या आहेत.ब्राझील शहरात तब्बल 32 मजल्यांची दफनभूमी आहे. मेमोरियल नेक्रोपोल एक्यूमेनिका असे त्या दफनभूमीचे नाव असून तेथे प्रत्येक मजल्यावर कमीत कमी 150 मृतदेह गाडले जाऊ शकतात. या संपूर्ण 32 मजल्यांच्या दफनभूमीत तब्बल १४०० मृतदेह पुरण्याची सोय करण्यात आली आहे. ही दफनभूमी 1983 साली बांधली होती. तसेच आता या दफनभूमीवर आणखी काही मजले वाढविण्यात येणार आहेत.
ब्राझील व्यतिरिक्त लंडन, पॅरिस अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू ऑरिलियन्स आणि ल्यूसियाना, तसेच काही युरोपिय शहरांतही अशा बहुमजली दफनभूमी आहेत. याव्यतिरिक्त इस्त्रायलच्या तेल अविव शहरातही बहुमजली दफनभूमीचे बांधकाम सुरू आहे. ही जगातील सर्वात मोठी दफनभूमी असणार आहे. यात तब्बल अडीच लाख मृतदेहांना दफन करता येणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires